डी.ई.एस.सेकंडरी शाळेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; प्रभात फेरी, विविध कार्यक्रम घेण्यात आले!
दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी टिळक मार्ग येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेमध्ये सकाळ व दुपार विभागाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आदी उपस्थित होते...