म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवडच्या विद्यार्थ्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष घेतला अनुभव

शिक्षण विवेक    29-Mar-2025
Total Views |

म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवडच्या विद्यार्थ्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष घेतला अनुभव 

म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवडच्या विद्यार्थ्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष घेतला अनुभव

सासवड शहर ता १२ :

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित वाघीरे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सासवड, या शाळेला ११८ वर्षांची ऐतिहासिक अशी शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. विद्यालयाचे प्राचार्य दत्ताराम रामदासी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आले होते. मुंबई येथे सुरु असलेले महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्यासाठी शाळेतील इयत्ता ९ वी मधील ३५ विद्यार्थ्यांनी मंगळवार

दिनांक ११ मार्च रोजी राज्याचा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहातील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या या विशेष अभ्यास सहलीस पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय शिवतारे यांनी विशेष सहकार्य केले आहे.

या अभ्यास सहलीत विद्यालयाचे प्राचार्य दत्ताराम रामदासी, शंकर विभाड, हिरामण सहारे, अर्चना उबाळे, मछिंद्र फडतरे व शिवहार लहाने इ. शिक्षक सहभागी झाले होते. फोटो : मुंबई विधिमंडळाच्या कामकाजाची पहाणी केल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक.