बाळ्या

23 Mar 2025 19:00:00


बाळ्या

 

रोज रोज रुसतोस

उगा अडून बसतोस

काय आहे मनात तुझ्या

सांग भडाभडा

वाच जरा बाळ्या आता

एकतरी धडा

 

दिवसभर खेळतोस

इकडे तिकडे पळतोस

खेळण्यांसाठी हट्ट करत

नको आवाज चढा

वाच जरा बाळ्या आता

एकतरी धडा

 

गत जाते अवघड

वाटते ओझे अवजड

पाठ कर पाढे त्यांना

बोल घडा घडा

वाच जरा बाळ्या आता

एकतरी धडा

 

आळस तुझा सोड

यश मिळेल गोड

कष्ट कर, अभ्यास कर

बन कोणी बडा

वाच जरा बाळ्या आता

एकतरी धडा

 

- राजेंद्र झुंजारराव

Powered By Sangraha 9.0