हळदी कुंकू स्नेहमय कार्यक्रम

शिक्षण विवेक    05-Feb-2025
Total Views |

 
 हळदी कुंकू स्नेहमय कार्यक्रम

 
 हळदी कुंकू स्नेहमय कार्यक्रम

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा येथे दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी स्त्री पालकांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले . यावेळी पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व पालक वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ. निता माळी मॅडम(लेखिका निवेदिका) तसेच विशेष उपस्थिती आसिया रिजवी मॅडम(नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राष्ट्रीय सचिव) उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजनाने झाली. पाहुण्यांचा परिचय सौ. राजश्री कांबळे मॅडम यांनी करून दिला.

प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ऋतुजा गवस मॅडम यांनी कार्यक्रमाचा उद्देश म्हणजेच प्रास्ताविक सादर केले. शाळेच्या प्रगतीसाठी पालक म्हणून आपण काय करू शकतो, तसेच आपल्या शाळेची प्रसिद्धी करून समाजामध्ये आपले जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सर्व पालकांनी प्रयत्न करणे या संदर्भात सौ गवस मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केले.नवीन प्रवेशासाठी आव्हान केले.

यानंतर प्रमुख पाहुणे माननीय सौ .नीता माळी मॅडम यांनी अतिशय लाघवी भाषेत आई व मुले यांच्यातील सुसंवाद कसा वाढवता येईल यासंदर्भात पालकांना मार्गदर्शन केले. आई म्हणून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी पालकांनी आपल्या दिनचर्या बदल करणे आवश्यक आहे. तसेच शाळा म्हणून शिक्षकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर सौ आसिया रिझवी मॅडम यांनी महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा पालकांना परिचय करून दिला. या विविध योजनांचा लाभ पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यशाळेचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट केले.

यानंतर पालकांसाठी लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाग्यवंत पालकांची निवड करून त्यांना पुस्तकाचे वाण देण्यात आले. वाचनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. आपल्या शाळेत असलेले वाचनालयाचा पुरेपूर वापर पालकांनी करावा व आपल्या मुलांसमोर आदर्श ठेवावा असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ ज्योत्स्ना चौधरी मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांची तसेच पालक वर्गाचे आभार मानले. यानंतर सर्व पालकांना हळदी कुंकू व शाळेचे नाव असलेल्या कापडी पिशव्यांचे वाण देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास संकुल प्रमुख व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. वाव्हळ सर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्षा सागवेकर मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ऋतुजा गवस मॅडम तसेच इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी विघ्ने मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री शेंडगे मॅडम यांनी केले.