कल्याण :
दिनांक ३० जानेवारी २०२५ या दिवशी वनवासी संवाद ट्रस्ट व छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण व अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण , यांच्या संयुक्त विद्यमाने वाघे पाडा , बापगाव भिवंडी येथे हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला.
वाघे पाड्यातील अंगणवाडीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने झाली.
उपस्थित महिलांना एक नवी साडी ,तिळगुळ व फुल दिले. तसेच अंगणवाडीतील बालगोपाळांस पाटी व पेन्सिल यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास वनवासी संवाद ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. बाबा काका जोशी ,
अभिनव शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. गिते सर, भारत विकास परिषदेच्या माननीय सौ . साधना जोशी मॅडम ,माननीय सौ. कविता मिश्रा मॅडम तसेच अभिनव शाळेतील सौ. गरवारे मॅडम ,सौ. गवारी मॅडम, श्री. सुरावकर सर व सौ. सांगळे ताई उपस्थित होत्या.
वाघे पाडा ग्रामपंचायत सदस्या श्रीमती गंगुबाई वाघे , सौ. रोशना वाघे सौ. लक्ष्मी मेहेर तसेच अभिनव शाळेची माजी विद्यार्थिनी विशाखा वाघे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मोलाचा हातभार लावला .
सदर कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांना शाळेत पाठवावे , यासाठी पालकांना आवाहन करण्यात आले. तसेच प्रौढ साक्षर वर्ग घेण्याचे व छोटे- छोटे व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याचे आश्वासन भारत विकास परिषद व अभिनव शाळेने दिले.
वनवासी संवाद ट्रस्टचे अध्यक्ष श्री. बाबा जोशी व शाळेचे मुख्याध्यापक श्री. गिते सर यांनी उपस्थित भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. गवारी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. गरवारे मॅडम यांनी केले.श्री. सुरावकर सर यांनी उपस्थितांना शाळेविषयीची संपूर्ण माहिती सांगितली.