मंगळवार दिनांक ४/०२/ २०२५ रोजी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ, पुणे - ३० येथील सकाळ व दुपार अशा दोन्ही विभागात रथसप्तमी (सूर्यनमस्कार दिन ) साजरी करण्यात आली. रथसप्तमी ची माहिती तसेच सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर सकाळ विभागातील इयत्ता ५ वी ते ९ वी आणि दुपार विभागातील इयत्ता ५ वी ते ७ वी अशा एकूण ५८० विद्यार्थ्यांनी १५,०८० सूर्यनमस्कार मंत्रासहित घातले. प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी, यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक प्रमोद उकिर्डे व देविदास वाकळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.