१४ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्व प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला

14 Feb 2025 17:52:32


matru-pitru pujan 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्व प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा न करता विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे औक्षण करून आई बद्दलचे प्रेम व्यक्त केले. मराठी शाळेमधूनच असे संस्काराचे बाळकडू मिळत असते.हीच संस्काराची शिदोरी देण्याचं काम विवेकानंद संकुल सानपाडा शाळा करत असते.

आजच्या कार्यक्रमास न.मु.म.पा. आरोग्य विभागाच्या नर्स सरिता पवार आणि पूजा इंगळे , पूर्व प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापिका सुवर्षा सागवेकर,प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापिका ऋतुजा गवस,प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका तनुजा नायर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, व पालक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आईचं औक्षण करून पूजन केले. आईचे आशीर्वाद घेतले..

अशा प्रकारे आपली संस्कृती जोपासण्याचा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला.

Powered By Sangraha 9.0