आर्ट फर्स्ट फाउंडेशनच्या वतीने विवेकानंद संकुल मध्ये कला प्रदर्शनाचे उद्घाटन
१० व ११ जानेवारी २०२५
प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा येथे भव्य चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.सदर प्रदर्शन आर्ट फर्स्ट इंडिया फाउंडेशन या अखिल भारतीय स्तरावर कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत भरवण्यात आलेले आहे. या प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी चित्रकलेच्या संदर्भात केलेल्या कामाचे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे.
प्रदर्शनामध्ये बिंदू ,रेषा पोत रंगाचे प्रकार व्यक्तिचित्रण अशा प्रकारच्या विविध कलाप्रकारांचा आविष्कार घडवण्यात आलेला आहे.
मानवी जीवनात असलेल्या कलेचा प्रभाव त्याचे चित्र कागदावर करण्यात आलेले आहे. मानवाच्या विविध प्रकारच्या भावना त्याला जाणवण्यात आलेले अनुभव त्याचे कलेत कशाप्रकारे प्रदर्शन करावे याचा उत्कृष्ट नमुना या चित्रातून आपल्याला पाहायला मिळतो.
प्रदर्शनासाठी आर्ट फर्स्ट इंडियाच्या सुकृती मॅडम, प्राजक्ता पालव मॅडम सुधीर पटवर्धन सर हेगजावेअर कंपनीचे पदाधिकारी, यु आर स्टॉप टेबल कंपनीचे पदाधिकारी संकुलातील सर्व विभागाचे मुख्याध्यापक श्री. विलास वाव्हळ,सौ ऋतुजा गवस,सौ.तनुजा नायर कार्यक्रमास उपस्थित होते.
आर्ट वर्ष प्रदर्शन यशस्वी करण्यामध्ये प्राजक्ता पालव मॅडम ,माजी मुख्याध्यापिका देशपांडे मॅडम त्याचप्रमाणे संतोष मिसाळ ,शितल जाधव, रमणी पवळे, शुभांगी कांबळे या शिक्षकांनी महत्त्वाचा वाटा उचलला कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. शाळेच्या वतीने त्यांचा उचित सत्कार करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका विस्तार अधिकारी
माननीय सौ.रेखा पाटील मॅडम ह्यांनीही सदर प्रदर्शनास भेट दिली. विद्यार्थांचे खूप कौतुक केले.