रमणबाग शाळेत वाङमय मंडळाचे उद्घाटन

04 Sep 2024 17:12:08

 
रमणबाग शाळेत वाङमय मंडळाचे उद्घाटन

रमणबाग शाळेत वाङमय मंडळाचे उद्घाटन

मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत वाड्मयमंडळ उद्घाटन व 'दोस्त ऋतू ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त कवीआणि बालभारतीचे सदस्य श्री. एकनाथ आव्हाड या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पीपीटीच्या माध्यमातून स्मार्ट बोर्डवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाङमय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. बालसाहित्यातून फक्त बोधामृत पाजले जात नाही तर चांगला विचार जागृत करण्याचे काम बालसाहित्य करत असते. कविता करण्यासाठी ती अगोदर समजून घ्यावी त्यातील ताल,लय याच्याशी जोडले जावे असा मुलांबरोबर त्यांनी संवाद साधला.त्यांनी दोस्त ऋतू या काव्यसंग्रहाचे उद्घाटन केले व त्यातील काही कवितांचे वाचन मुलांसमोर सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशक सुनिताराजे पवार यांनी केले. प्रा. विश्वास वसेकर यांनी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल आणि त्यातील काही कवितांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी तेजस कवितके, सोहम बागवे या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी वाड्मय मंडळाचे महत्त्व तसेच प्रकाशित काव्यसंग्रहा बद्दल आपल्या अध्यक्षीय भाषणातून माहिती दिली पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमास ड.डॉ.भालचंद्र सुपेकर,धनंजय सरदेशपांडे,रूपाली अवचरे,धनंजय तडवळकर, बाळकृष्ण बाचल,डॉ. संभाजी मलगे ,मदन हजेरी, शोभना रानडे असे दिग्गज बालसाहित्यकार उपस्थित होते.पाहुण्यांचा परिचय वाड्मय विभागप्रमुख अर्चना देवळणकर यांनी करून दिला.ऋणनिर्देश सीमा ढोण यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन ऋचा कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.जयंत टोले पर्यवेक्षिका अंजली गोरे,मंजुषा शेलुकर उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0