श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्त्व उपक्रम घेतला.

19 Sep 2024 10:07:17

श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्त्व उपक्रम घेतला. 
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथे कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्त्व उपक्रम घेतला.
दिनांक 19/9/ 2024 वार गुरुवार रोजी कला कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्त्व या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून माननीय मुख्याध्यापिका श्रीमती भारती मॅडम, कलाकौशल्य महत्व सांगण्यासाठी राजस्थान येथील आमंत्रित केलेले प्रमुख मार्गदर्शक श्री हरीशराव जलालराव व प्रमुख उपस्थित विभाग प्रमुख श्री रतन गिरी सर हे होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अनुराधा लाहोरकर यांनी केले. वैयक्तिक पद्य श्रीमती क्षीरसागर मॅडम यांनी सादर केले. त्यानंतर कला कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्व माननीय श्री हरीशराव जलालराव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कला कौशल्य कृती मधून शिकायला हवीत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कोणकोणत्या प्रकारचे कला कौशल्य आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे गरजेचे आहे आपण जे शिक्षण घेत असतो त्या शिक्षणाची आपण कोणती कौशल्य शिकू शकतो किंवा कोणत्या कौशल्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतो हे पाहणे आवश्यक आहे एखाद्या क्षेत्रातील प्राविण्यता दाखवण्यासाठी शिक्षण घेत असताना आपल्यामध्ये सभाधीटपणा त्याचबरोबर भाषण कला भाषणाचे लेखन करणे सूत्रसंचालनाची स्क्रिप्ट तयार करणे इत्यादी गोष्टी आपण कशा पद्धतीने अवगत कराव्यात या विषयी माहिती दिली. अशा प्रकारचे कौशल्य आपण आत्मसात तर करायचेच आहेत त्याचबरोबर कार्यानुभव विषयातर्गत कागदकाम हे कला कौशल्य याचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व प्रत्यक्ष कागदी वस्तू स्वतःच्या कला कौशल्याने कशा तयार करायच्या याविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान दिले. विविध प्रकारच्या कागदी वस्तू माननीय श्री हरीशराव जलालराव यांनी करून दाखवल्या. कमळाचे फुल, आकाश कंदील, पक्षी, विविध फुले, कागदी तोरण, पुष्पगुच्छ,मासे, कागदी पिशवी, होडी, कागदाचे दिवे,जापानी पंखा, घर, हत्ती मुखवटा,छत्री, पतंग, बेडूक, टोपी तसेच फोटो फ्रेम, टाकाऊ पासून टिकाऊ व आकर्षक सौंदर्यकृती त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना करून दाखवल्या. यानंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी देखील अशा प्रकारच्या विविध कागदी वस्तू व टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ आकर्षक अशा सौंदर्यकृती केल्या.
कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष माननीय मुख्याध्यापिका श्रीमती भारती मॅडम यांनी अध्यक्ष समारोप केला. कला कौशल्याचे महत्त्व सहज सोप्या प्रेरक अशा गोष्टी मधून त्यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनुराधा लाहोरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्रीमती वर्षा फासे यांनी केले. शांती मंत्राने कार्यक्रमाचे सांगता झाली.
कार्यक्रम प्रमुख- श्रीमती अनुराधा लाहोरकर
Powered By Sangraha 9.0