प्रेम बाईंमध्ये दडलेल्या बाबा व आईचे

13 Sep 2024 11:25:13
 
प्रेम बाईंमध्ये दडलेल्या बाबा व आईचे 
प्रेम बाईंमध्ये दडलेल्या बाबा व आईचे
‌‘प्रेम' या शब्दाचा अर्थ शब्दांत सांगणं मोठ कठिणचं कारण प्रेमं ही भावना नसून प्रेम हे आपलं अस्तित्व असतं. खरतरं आई म्हणून माझ्या मुलीवर प्रेम करताना प्रसंगी कडक शिस्त, प्रसंगी लाड, प्रसंगी खट्याळ मैत्री अशा अनेक गोष्टी सहजरित्या होत गेल्या. त्यातूनच प्रेम खुलत गेल व एकमेकींना आपल्या अस्तित्वाची जाणीव होत गेली. हे झाल माझ्या मुलीच्या बाबत
पण मी नेहमी म्हणते मला एक नाही तर एकोणसत्तर मुली आहेत. अरे बापरे! असं कसं प्रश्न पडला असेल ना हो मला 69 मुली आहेत कारण मी आई बरोबरच एक बाई (शिक्षिका) पण आहे. आई होण्याच्या आधीपासूनच बाई होण्याचे सौभाग्य मला लाभले. ‌‘बाई' हा शब्द तसा आता दुर्मिळच वापरला जातो. आई मधला ‌‘ई' व बाबांचा ‌‘बा' मिळून तयार झालेल्या ‌‘बाई' प्रसंगी आईसारख्या मृदु कधी बाबांसारख्या योग्य ठिकाणी रागावणाऱ्या यातूनच प्रेम ही भावना माझ्या मनात दृढ होत गेली. अनेक वर्षे हजारो मुलींवर मी माझ्या मुलींप्रमाणे प्रेम केलं त्याच्या बदल्यात मला काय मिळाले? खूपच मौल्यवान, निरागस, निस्वार्थी, निखळ, अतुलनीय व अगणित प्रेम माझ्या चिमुकल्या विद्यार्थिनींकडून खरतरं त्यांच प्रेम करण्याची पद्धतच लईभारी ती कशी ? काहीही होऊ दे मग ते आनंदाचं असू दे अथवा दु:खाच आधी बाईंना येऊन सांगणे, आईने डब्ब्यात दिलेला खाऊ बाईंना खाण्याचा आग्रह करणे, बाईंच्या टेबला भोवती रेंगाळणे, आवाज देताच धावत पुढे येणे, बाईंनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला तर जणू काही त्यांना आकाशच ठेंगणे झाल्यासारखं वाटते किती ना हे निरागस प्रेम. वर्ग सोडून जाताना बाई पुढच्या वर्षी तुम्हीच आम्हाला या हे सारखं सारखं म्हणताना त्यांच्या आणि माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावतात ते आमचं प्रेम हे सगळ्यांच्याच नशिबात नसतम बरं का ! एक पालक म्हणून तर आपण आपल्या मुलांवर प्रेम करतोच पण बाई म्हणून बाबा आणि आई दोघांचाही प्रेम देण्याचा आनंदच निराळा! आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं असेल ते माझ्या या चिमुकल्यांच्या प्रेमामुळेच यात शंकाच नाही.
 मोनिका नेसासकर
पालक,
एन.ई.एम.एस.पुणे  
Powered By Sangraha 9.0