एन.ई.एम.एस शाळेत विद्यार्थिनींनी फोडली पर्यावरण पूरक दहीहंडी

28 Aug 2024 14:55:50

  एन.ई.एम.एस शाळेत विद्यार्थिनींनी फोडली पर्यावरण पूरक दहीहंडी

 

एन.ई.एम.एस शाळेत विद्यार्थिनींनी फोडली पर्यावरण पूरक दहीहंडी

पुणे: दि.२७ ऑगस्ट रोजी गोपाळकाल्याचे औचित्य साधून शनिवार पेठेतील एन.ई.एम.एस शाळेतील सकाळ व दुपार विभागातील ५वी ते ७वी च्या विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक हंडी फोडण्याचा मान मिळविला. विविध फळांच्या,फुलांच्या बिया कागदी पिशव्यांमधे घालून त्या पिशव्या हंडीत ठेवल्या होत्या ही हंडी फोडल्यावर विद्यार्थ्यांनी त्या पिशव्या गोळा केल्या व मिळालेल्या बिया रुजवून झाडे लावण्याची प्रतिज्ञा घेतली.

विद्यार्थिनींच्या पथकाने म्हणजे एन.ई.एम.एस च्या राधेने हंडी फोडली.स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत 'स्त्री पुरुष समानता' हाच संदेश यातून देण्यात आला.

गोपाळकाल्याच्या या कार्यक्रमात इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.शिक्षिका ज्योती पवार आणि संहिता चंदनशिव यांनी गोकुळाष्टमीची माहिती दिली.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Powered By Sangraha 9.0