अनोखी राखीपौर्णिमा...

22 Aug 2024 10:16:37


अनोखी राखीपौर्णिमा 

अनोखी राखीपौर्णिमा...

राखीपौर्णिमा म्हणजे बहीणभावाच्या नात्यातील गोडवा जपण्याचा दिवसडे-ए.सो.च्या न्या. रानडे बालक मंदिरात मंगळवार दि. २०ऑगस्ट २०२४ हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला समाजहितासाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना यानिमित्ताने आमंत्रित करण्यात आले पत्रकार, अग्निशमन दलाचे अधिकारी यांना मोठ्या गटातील मुलींनी औक्षण करून राखी बांधून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र टाइम्सच्या श्रद्धा सिदीड यांनी मुलांशी संवाद साधला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी छोट्या व मोठ्या गटातील मुलांना 'आग कशी विझवतात 'याची प्रात्यक्षिके दाखवली व मुलांशी संवाद साधून त्यांना माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अमिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले.

Powered By Sangraha 9.0