डी.ई.एस शाळेत ७८वा ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहात

16 Aug 2024 17:33:04


डी.ई.एस शाळेत ७८वा ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहात

पुणे: आज दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी टिळक मार्ग येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळेत ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

एस.एस.सी.बोर्ड परीक्षा, मार्च२०२४मध्ये शाळेत प्रथम क्रमांक मिळविणारी विद्यार्थिनी सिद्धी देवळे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाला समिती अध्यक्षा राजश्री ठकार, डी.ई.एस.सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी,पर्यवेक्षिका सरिता स्वादी, राधा केतकर, ग्रेसी डिसूजा, सिमरन गुजर, शिक्षक,शिक्षिका,पालक, विद्यार्थी, उपस्थित होते.

कार्यक्रमात शालेय प्रार्थना, बँड पथक संचलन, देशभक्ती गीते, स्त्रीशक्ती,नाटक,नृत्याचा समावेश होता. विकसित भारताच्या संकल्पनेवर आधारित राष्ट्रभक्तीपर गीत नृत्याविष्कारात लहान मुलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक सकाळ व दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले.

प्रास्ताविकपर भाषण विजया जोशी यांनी केले. जोशी यांनी स्वातंत्र्याचा आनंद घेत आदर्श नागरिक होण्याचे आवाहन केले. सिद्धी देवळे हिने स्वातंत्र्याबद्दलचे विचार प्रकट केले. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस आदीं महान व्यक्तींच्या योगदानाचा उल्लेख करत भारताच्या विकासासाठी संकल्प केला पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन शीतल शिंदे यांनी केले. सरिता स्वादी यांनी आभार मानले.डी.ई.एस.शाळेतील संगीत शिक्षिका, शारीरिक शिक्षक,शिक्षिका यांनी कार्यक्रमांना मार्गदर्शन केले.वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

स्वातंत्र्य दिनाच्या यशस्वीतेसाठी डी.ई.एस.शाळेतील मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे

शिक्षक डी.ई.एस. सेकंडरी स्कूल,पुणे

Powered By Sangraha 9.0