रमणबागेतील विद्यार्थ्यांनी महापुस्तकाच्या रचनेत केले महावाचन

10 Aug 2024 17:42:37

महावाचन 
*रमणबागेतील विद्यार्थ्यांनी महापुस्तकाच्या रचनेत केले महावाचन *
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी महावाचन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी ' पुस्तकाची प्रतिकृती व महावाचन या शब्दाची रचना' साकारत आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन केले.प्रशालेच्या पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक सौ.चारुता प्रभुदेसाई यांनी रचलेल्या
वाचनगीताचे गायन तनय नाझीरकर याने केले. प्रशालेच्या शालाप्रमुख सौ चारुता प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेला उपमुख्याध्यापक जयंत टोले व शिक्षक रवींद्र सातपुते यांनी शाला समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर यांच्या उपस्थितीत साकार केले.सदर उपक्रमात प्रशालेतील २१०० विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहभागी झाले.
Powered By Sangraha 9.0