फणसाच्या झाडाखालील शाळा

शिक्षण विवेक    26-Jul-2024
Total Views |


फणसाच्या झाडाखालील शाळा 

बिन भिंतीची उघडी शाळा,

लाखो इथले गुरू,

झाडे, वेली, पशुपाखरे,

यांची गोष्टी करू

झाडे म्हणजे काय? आपल्याला फळे-फुले देणारे, ऑक्सिजन देणारे, उन्हात शीतल छाया देणारे आणि बिन भिंतीची उघडी शाळा म्हणजे झाडे. तसेच आमच्या शाळेतील फणसाचे झाड. ते खूप मोठे-मोठे उन्हाळ्यात फणस लागत असतात. मला असे वाटते, त्या फणसाच्या झाडामुळे अजून आमच्या शाळेची शोभा वाढली आहे आणि हे खरं आहे.त्या दिवशी त्या गोड फणसाच्या झाडाने आम्हांला खूप मदत केली. उन्हात शीतल छाया दिली, तेव्हा तर खूप छान वाटले. मज्जा पण आली, कारण १५ मार्चला दहावीचा पेपर होता. त्यामुळे आम्हांला माध्यमिकच्या शाळेत बसू दिले नाही आणि त्यात आमच्या शाळेत रंगकाम चालू होते. आमच्याच वर्गाचे. सगळे आपापल्या वर्गात जाऊन बसले. आम्हांला वर्गच नव्हता. आमच्या ज्योतीताईंचे डोळे भरून आले होते. त्यांना वाईट वाटत होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी वर्गातील चार-पाच मुलांना हाताला घेऊन सतरंजी, फळा इत्यादी. सर्व सामान आणले आणि आमची ‌‘बिन भिंतीची उघडी शाळा‌’ फणसाच्या झाडाखाली भरली. आमचा तो दिवस खूप छान गेला. खूप मज्जा आली. आनंद वाटला. मी घरी येऊन ह्या फणसाच्या झाडाखालील शाळेबद्दल सर्वांना सांगितले. त्यांना ह्या अनोख्या शाळेबद्दल खूप आवडले. मला त्यांना सांगताना सुद्धा खूप छान वाटत होते. संपूर्ण दिवस आनंदात गेला. पक्ष्यांचा आवाज येत होता. वारा खळखळून वाहत होता. सूर्याची किरणे अंगावर पडत होती. कोणीही आमच्या वर्गाला डिस्टर्ब करायला नव्हते. फक्त आमचे फणसाचे झाड, आम्ही, आमच्या आजूबाजूचे पक्षी आणि आजूबाजूची झाडे एवढंच बाकी कोणीही नाही. त्यामुळे आमचा त्या निसर्गरम्य वातावरणात छान झाला. शिकवलेले समजले. खूप मज्जा आली आणि आता आमच्या सर्व मुलांची इच्छा आहे. परत एकदातरी आमचा वर्ग त्या फणसाच्या झाडाखाली भरावा.ढहरपज्ञ Thank you so much sweet Jackfruit tree.

- संकष्टी पांगारे