शाळा ही पंढरी...विठ्ठल विद्यार्थी...

17 Jul 2024 15:44:01


शाळा ही पंढरी..  

शाळा ही पंढरी

विठ्ठल विद्यार्थी

मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी जिजाई बाल मंदिर प्राथमिक व मो.कृ. नाखवा हायस्कूल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रवेशद्वारावरून करण्यात आली.इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लहान बालगोपाल(इयत्ता पहिली ते चौथी) वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये दिंडीमध्ये सहभागी झाले होते. काही विद्यार्थी विठ्ठल रुकमाई च्या रूपात ( वेशभूषेत ) हजर झाले होते. डोक्यावर तुळस,गळ्यात टाळ ! लहान मुलांनी विविध प्रकारचे अभंग, भक्ती गीतांचे गायन केले. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान स्वरूपामध्ये टाळ,मृदंग, ढोल ताशा चा उपयोग करून लेझीम सादरीकरण केले. वृक्षभक्तीची दिंडी जवळच असलेल्या विठ्ठल रुकमाई च्या मंदिरामध्ये(चेंदणी कोळीवाडा) नेण्यात आली, मंदिरामध्ये विविध भक्तीगीते घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. दिंडी परिसरातून जात असताना विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घोषणा दिल्या. प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सौ.ऋतुजा रविंद्र गवस,माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री.बबन निकुम ,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष, समाजसेवक श्री.जगन्नाथ केदारे,पालकवर्ग दिंडीस उपस्थित होते.पर्यावरण पूरक,भक्तीमय वातावरणात दिंडी संपन्न झाली.

Powered By Sangraha 9.0