फळे

22 Mar 2024 16:16:18

फळे
 
फणस असताे फार मोठा,
काट्याने भासताे अति खाेटा 
 
सफरचंद मात्र फार छान,
फळांमध्ये त्याला खूपच मान 
 
डाळींबाचे दाणे रसदार,
खाताना मात्र व्यायाम फार 
 
अननसाची चव आंबट गाेड,
त्याचे अंग फारच खडबड
 
संत्री मोसंबी रसाळ सारी, 
आंबटपणाने दात आंबतात भारी
 
पेरू असताे गाेड आंबट,
सर्दी हाेईल झटपट
 
आंबा आहे फळांचा राजा,
खातांना येते फारच मजा
 
 
- वैष्णवी पांडे,
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय, माजलगाव. 
Powered By Sangraha 9.0