रमणबाग शाळेत 'गोष्ट इथे संपत नाही' या कार्यक्रमातून शिवसंस्कार

11 Dec 2024 11:06:00


'गोष्ट इथे संपत नाही' कार्याक्रमातून झाले शिवसंस्कार\ 

 रमणबाग शाळेत 'गोष्ट इथे संपत नाही' या कार्यक्रमातून शिवसंस्कार

शनिवार दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत 'गोष्ट इथे संपत नाही 'या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी श्री.सारंग मांडके आणि श्री.सारंग भोईरकर यांनी अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत छत्रपती शिवरायांनी केलेल्या अफजलखान वधाची शौर्यकथा विद्यार्थ्यांसमोर सादर केली.

इतिहासाच्या पुस्तकातील घटनेचे गोष्टीरूप कथन ऐकण्यात विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांनी शिवसंस्कार करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ठेवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा केदारी यांनी केले तर अतिथींचा परिचय कवडे मॅडम यांनी करून दिला.उपप्रमुख जयंत टोले,पर्यवेक्षिका मंजुषा शेलूकर व अंजली गोरे सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0