जागतिक दिव्यांग दिन

11 Dec 2024 11:09:21

 

जागतिक दिव्यांग दिन

 

आज मंगळवार, दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी म. ए . सो.मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे, येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेतील दिव्यांग युनिटच्या शिक्षिका श्रीमती आराणके अमृता मॅडम यांनी दिव्यांग दिन का साजरा करावा यामागची कारणे स्पष्ट केली. प्रशालेत शिकून मोठ्या झालेल्या,व उच्च पदांवर कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती देखील दिली.
त्याचप्रमाणे प्रशालेतील सर्वात पहिले दिव्यांग विद्यार्थी यांनी दिव्यांगांविषयी केलेल्या कवितेचे वाचनही केले व दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्याप्रमाणेच समान समजून कायम मदत करण्याचे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले. या याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. वसावे सर, उपमुख्याध्यापक माननीय श्री. गवळे सर तसेच पर्यवेक्षिका माननीय सौ.लिमये मॅडम , सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0