अश्विन महिना लागताच लगबग सुरू होते ती दिवाळीची. नेमके हेच औचित्य साधून टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत एक अनोखा उपक्रम सादर केला. शिक्षिका आणि विद्यार्थी यांनी एकत्र मिळून सुगंधी उटणे, आकर्षक पणत्या, कुंदन रांगोळ्या, अत्तर आणि आकर्षक पाकिटे तयार केली आणि त्याचे क्रिएटिव हँड या नावाने मोठे प्रदर्शन भरवले. यामधे मुले स्वतः वस्तू विकत होती. त्याची मजा घेत होती. प्रवेशद्वारावर लहान मुले सर्वांचे स्वागत करत होती. सर्व पालकही त्यांना प्रोत्साहित करीत होती. शाळेत इतरही परिचयातील व्यक्तींनी आपले स्टॉल लावून यात सहभागी झाले होते.
या प्रसंगी फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वाती जोगळेकर तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या उपसंपादक सौ. श्रध्दा सीदिड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर मुलांचे कौतुक करण्यासाठी शाळेच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ठकार आवर्जून उपस्थित होत्या. हा सर्व कार्यक्रम मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.