दिवाळी साजरी करूयात सैनिकांसमवेत

19 Oct 2024 15:39:01

दिवाळी साजरी करूयात सैनिकांसमवेत
दिवाळी साजरी करूयात सैनिकांसमवेत
कै. वि. मो. मेहता माध्यमिक शाळेत दिवाळी साजरी करू सैनिकांसमवेत या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर , शाळा समिती अध्यक्ष यांच्या एकत्रित योगदानातून सीमेवर तैनात सैनिकांसाठी दिवाळीचा फराळ ,भेटकार्ड, पत्र व कविता पाठवण्यात आल्या.
याकरिता घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. अरुण कुमार तळीखेडे व त्यांचे समस्त संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. श्री. विक्रम खेलबुडे, शाळा समिती अध्यक्ष मा. श्री.राजेश पटवर्धन उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जन्मदात्या आईचा, शिक्षकांचा, सैनिकांचा व अन्नाचा आदर करा असे मोलाचे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर रणांगणातील काही हृदयस्पर्शी अनुभव कथित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. श्रुती बागेवाडी यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. दीप्ती इंगळे व आभार सौ. शितल कोर्टीकर यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0