रमणबाग शाळेत वाचन प्रेरणादिना प्रित्यर्थ पुस्तक परीक्षणाचे सादरीकरण

15 Oct 2024 13:00:32
 
रमणबाग शाळेत वाचन प्रेरणा दिना प्रित्यर्थ पुस्तक परीक्षणाचे सादरीकरण
रमणबाग शाळेत वाचन प्रेरणा
दिना प्रित्यर्थ पुस्तक परीक्षणाचे सादरीकरण
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मंगळवार दि.१५ऑक्टोबर२०२४ रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई,उपमुख्याध्यापक जयंत टोले व पर्यवेक्षिका मंजुषा शेलुकर यांच्या हस्ते करण्यात आले. महावाचन गीताचे गायन तनय नाझीरकर याने केले.'फिरूनी नवी जन्मले मी' या अरुणिमा सिन्हा यांच्या प्रभाकर करंदीकर यांनी अनुवादित केलेल्या आत्मकथन पर पुस्तकाचे परीक्षण उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी सादर केले.ग्रंथपाल शैलेश नागवडे यांनी ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले.अथर्व यावलकर याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन केले.
Powered By Sangraha 9.0