म.ए.सो.मुलांचे विद्यालय अर्थात भावे हायस्कूल येथे एक मुष्टी धान्य समर्पण सोहळा साजरा.

15 Oct 2024 12:57:33

म.ए.सो.मुलांचे विद्यालय अर्थात भावे हायस्कूल येथे एक मुष्टी धान्य समर्पण सोहळा साजरा. 
म.ए.सो.मुलांचे विद्यालय अर्थात भावे हायस्कूल येथे एक मुष्टी धान्य समर्पण सोहळा साजरा.
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी प्रशालेच्या प्रांगणात सरस्वती पूजनाने सोहळ्यास सुरुवात झाली.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी समर्पण सोहळ्यानिमित्त होणारा सामाजिक जाणिवेचा संस्कार महत्त्वाचा असून गरिबांची दिवाळी चांगली व्हावी हा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी शिवसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी आपल्या संस्थेचा स्थापना हेतू सांगून गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न सांगितले. यानंतर प्रशालेचे शाळा समितीचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ व मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे तसेच पदाधिकारी यांचे हस्ते नऊ पोती तांदूळ चार पोती गहू दोन पोती ज्वारी एक पोतं बाजरी व शालेय कर्मचाऱ्यांच्या वतीने 130 किलो खाद्यतेल शिवसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांना प्रशालेच्या वतीने देण्यात आले. सदरहू धान्य प्रशालेच्या पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी जमा केले होते.
प्रमुख पाहुणे एन डी पाटील यांनी आपल्या मनोगतातून दा तृत्वाचे महत्त्व सांगितले. देण्याची वृत्ती जपणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. त्यांनी सर्वांनी आपल्या संस्कृतीचे जतन करताना समाजाचाही विचार करावा असा संदेश दिला
दुसरे प्रमुख पाहुणे श्री पराग समुद्र यांनी आपल्या मनोगतातून सतपात्रिदानाचे महत्त्व सांगून एक मुष्टी धान्य सोहळ्याचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतातून शाळा समिती अध्यक्ष श्री दिलीप शेठ यांनी दान केल्याने चांगले परिणाम फळ मिळते असे सांगितले.
यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ दिपाली बधे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन सौ मंजुश्री शिंदे यांनी केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे,पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये सर्व शिक्षक वर्ग व पाचवी ते दहावीचा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
सौ.योगिता चौकटे
सहाय्यक शिक्षिका
म.ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे-30
Powered By Sangraha 9.0