श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय येथील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला भेट देऊन संगणक ज्ञान प्राप्त केले.
आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 शुक्रवार रोजी सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुमती भारती मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती अनुराधा लाहोरकर यांनी इयत्ता तिसरी ड च्या विद्यार्थ्यांसाठी एक अगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ला भेट देऊन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कशाप्रकारे असते, त्या ठिकाणी कोण कोणते कम्प्युटर कोर्सेस चालतात,कॉम्प्युटर विषयीचे सखोल व विस्तृत ज्ञान प्राप्त केले.
रुद्रवार कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या ठिकाणी विद्यार्थी गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.या ठिकाणी प्रमुख उपस्थित सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुमती भारती मॅडम, सौ पूजा रुद्रवार, विभाग प्रमुख श्री रतन गिरी, श्रीमती अनुराधा लाहोरकर, श्री रंगनाथ तौर, श्री अब्बडवार, या मान्यवरांचा परिचय व स्वागत यानंतर संगणकाची माहिती सांगत असताना विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. संगणक म्हणजे काय? संगणकाचे वेगवेगळे भाग याची माहिती, संगणक प्रत्यक्षपणे कसे हाताळतात, ऑनलाइन विविध कोर्सेस, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ऑनलाइन स्पर्धा परीक्षा, संगणकावर बऱ्याच गोष्टी करता येतात याची माहिती सौ पूजा रसिक रुद्रवार यांनी दिली.
संगणका विषयी माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संगणक हाताळले. यावर त्यांनी विविध रंगांची माहिती, चित्र कसे काढावे, रंग कसे भरावे, याविषयी ज्ञान प्राप्त केले तसेच इंग्रजी शब्द मराठी शब्द टाईप करण्याचा प्रयत्न केला. ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे दिली, अशा विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर वर्कशॉप प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमामध्ये तिसरीच्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यापैकी 29 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले. शेवटी श्रीमती अनुराधा लाहोरकर यांनी रुद्रवार कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे आभार व्यक्त केले.