पंढरीच्या विठुराया या वर्षी येतो बघ
आषाढी एकादशीच्या दिवशी तुला पाहून धन्य होतो बघ
सावळा रंग तुझा कपाळावरती टिळा
कटेवरती हात तुझा दिव्य असा सोहळा
पन्नास वर्ष झाली तुझ्या चरणाशी येतो
का रे विठ्ठला एकादशीच्या दिवशी मला दर्शन नाही होत
तुळशीच्या दलासारखा पवित्र असा तू
कोरोनाच्या काळात दाखवलीस तुझी महती तू
आम्हाला कंटाळला का रे? दोन वर्ष बोलावलं नाहीस
पण तुला म्हणून सांगतो विठ्ठला तुझ्याशिवाय आम्हांला काही करमत नाही.
हजारों येती, हजार मागण्या करून जाती
शांतपणे डोळे बंद करून ऐकताना तू कंटाळत कसा नाहीस
या वर्षी माझे वारीचे एक्कावन्नावे वर्ष आहे.
तुझे रूप बघून डोळ्यांचे पारणे फेटावे हाच त्यामागचा हेतू आहे.
चल मग विठुराया या वर्षी येतो बघ
या वर्षी तरी एकादशीच्या दिवशी दर्शन द्यायचं तेवढं बघ.
- अन्विता आनंद जोशी