Enter your Email Address to subscribe to our newsletters
ध्यानी मनी नाम विठ्ठलाचे
गात्रे जरी थकली,मन प्रफुल्लित
सवंगडी मिळती, जन्मोजन्मीचे.
पंढरीची वाट जीव लागे ओढ,
हरिनाम मुखी, दिनरात्री
ऊन वा पाऊस, चढ वा उतार
मार्ग क्रमण करणे, मोदभरे.
पंढरीची वाट आनंदे सरली,
दुर्लभ दर्शन सुलभही झाले
विठू माझा आत्मा, विठू माझा श्वास
जन्म मरण फेरा तूच चुकविशी
तुझ्या पायी देह, तुझे पायी आत्मा
तूच परमात्मा ह्या जगताचा.
- डॉ. सविता केळकर