लाकडी चमच्यांची फुलदाणी (फ्लॉवरपॉट)

02 May 2023 17:30:00


साहित्य ःलाकडी चमचे (आईस्क्रीमचे), कार्ड पेपर, पुठ्ठा, चमकी, लेस, फेव्हिकॉल, मणी (कुंदन)

 साहित्य : लाकडी चमचे (आईस्क्रीमचे), कार्ड पेपर, पुठ्ठा, चमकी, लेस, फेव्हिकॉल, मणी (कुंदन)

कृती : प्रथम गोल आकाराचा छोटा पुठ्ठा कापून त्याला कार्ड पेपर चिटकवणे. कार्ड पेपरचा कोनचा आकार करून विशिष्ट पद्धतीने पुठ्ठ्याच्या बरोबरमध्ये चिटकवणे (फोटोत दाखवल्याप्रमाणे तो कोन तयार करणे.) चमच्यांची पकडण्याची बाजू कापून घेणे. चमच्यांनामध्ये फेव्हिकॉल लावून त्याच्यावर चमकी लावून घेणे. तयार केलेले चमचे कोनावर गोलाकार पद्धतीने व्यवस्थित चिटकवणे (फोटोत दाखवल्याप्रमाणे) खालील पुट्ठयालाही चमचे चिटकवणे. चिटकवलेल्या कोनाच्या आणि पुठ्ठ्यांच्यामध्ये लेस चिटकवणे आणि मध्ये मध्ये कुंदन चिटकवणे. अशा प्रकारे सुंदर फुलदाणी तयार होते.

- श्रद्धा कदम, पालक,

डी..एस. इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे

Powered By Sangraha 9.0