साहित्य : 4 बांगड्या, सुतळी, खराट्याची काडी, पांढरे मणी, कागदी कप, कागदी पुठ्ठा, गोल्डन पट्टी, फेव्हिकॉल इत्यादी.
कृती : सायकल तयार करताना प्रथम तीन बांगड्यांना, खराट्यांना व कपांना सुतळी गुंडाळून फेव्हिकॉलने ती चिटकवणे. सुतळी गुंडाळून झाल्यानंतर सायकलच्या मागील बाजूस दोन सुतळी गुंडाळलेल्या बांगड्यांमध्ये खराट्याची कडी ठेवून फेव्हिकॉलने जोडणे; तसेच समोर एक सुतळी गुंडाळलेली बांगडी ठेवून दुसर्या सुतळी गुंडाळलेल्या खराट्याच्या काडीने जोडून घेणे.
समोरील बांगडीला दोन लहान उभ्या काड्या लावून त्यास एक लहान आडवी काडी जोडून सायकलला असलेले हॅण्डल तुम्ही तयार करा. मागील बाजूस सुतळी गुंडाळलेला कप ठेवून फेव्हिकॉलने चिटकवून घेणे. नंतर कपावर बांगडी ठेवून त्यावर पांढरे मणी चिटकवणे व पुढील हॅण्डलवरसुद्धा पांढरे मणी चिटकवणे; तसेच हॅण्डल व कप यांच्यामध्ये एक सुतळी गुंडाळलेली खराट्याची काडी जोडून घेणे. शेवटी सायकलचा आकार तयार झाल्यावर ती सायकल कागदी पुठ्यावर फक्त बांगडीच्या (म्हणजेच सायकलचे चाक) खालील बाजूस फेव्हिकॉलने चिटकवणे. नंतर सायकल छान दिसण्यासाठी पुठ्ठ्याच्या कडेला गोल्डन पट्टी चिटकवणे.
अशा प्रकारे सुतळीच्या साह्याने टाकाऊपासून टिकाऊ अशी छान सायकल तयार होईल.
- निधी साबळे, 1 ली,
कै.वि.मो. मेहता प्राथमिक शाळा, जुळे सोलापूर