एक होती इडली
ती होती चिडली
धावत धावत आली
सांबारात बुडाली
सांबार होते गरम गरम
इडली झाली नरम नरम
चमचा आला खुशीत
जाऊन बसला बशीत
चमच्याने पाहिले इकडे तिकडे
इडलीचे झाली तुकडे तुकडे
इडली होती फारच मस्त
आम्ही मुलांनी केली फस्त
-समृद्धी तुरकुंडे,
म.ए.सो.चे कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक
व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती.