जय जय महाराष्ट्र माझा
जय हो महाराष्ट्र माझा
इथेच घडले शिवबा अन् संभाजी
ज्यांनी केली स्वराज्य बांधणी
म्हणूनच रक्षणार्थ सह्याद्री उभी राहिली
इथेच जन्मले तुकोबा अन् चोखामेळा
ज्यांनी विश्व कल्याण जोपासले ते माऊली
म्हणूनच धन्य ठरली संताची पावन भूमी
इथेच शाहू फुले अन् टिळक-आगरकर झाले
ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राण वाहिले ते कर्वे अन् भावे
म्हणूनच देशाची घडी बसवण्या आंबेडकर जागले
इथेच वाहते भीमा कृष्णा गोदावरी अन् उत्तुंग सह्यगिरी
ज्यांनी आपल्या पावनतेने पुराण ही गाजवली
म्हणूनच वाटे आहेच श्रेष्ठ ही माझी मायमाऊली
इथेच आहे ज्योतिर्लिंग पूर्ण करण्या वैजनाथ परळी
ज्यांनी पवित्र केली असे ते मुकुंदराज आद्यकवी
म्हणूनच अभिमानाने मान उंच उंच सदैव चंपावती
आहेच श्रेष्ठ म्हणून माझी माय मराठी
जी कला-संस्कृती आणि साहित्यानं नटली
म्हणूनच गर्व आहे मी महाराष्ट्र अन् जय महाराष्ट्र माझा
- सोनाली साबळे (दाभाडे), शिक्षिका,
श्री. चिंतेश्वर प्रा व मा विद्यालय, बीड