आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये, आपल्या कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या पुढच्या पिढीला, सहज दैनंदिन व्यवहारातून सत्कृत्यांची सवय लावण्याचे कार्य, पिढ्यानुपिढ्या कुटुंब व्यवस्थेतून होत आहे. सत्कृत्यांच्या वारंवारितेने त्यांचे संस्कारात रुपांतर होते. या संस्कारातून कुटुंबातील लहानात लहान आणि मोठ्यात मोठी व्यक्तिसुद्धा नकळत संस्कारित होत असते. अशा संस्कारित होणाऱ्या असंख्य सामान्य व्यक्तींचा सहज व्यवहार आपली संस्कृती बनवत आला आहे.
कुटुंबातून सहज होणाऱ्या संस्कारांचा विचार करताना अनेक गोष्टी ध्यानात येतात. मी’मधून आम्ही’ आणि अहंम्पासून वयम्’च्या संस्काराची सुरुवात येथेच होते. आम्ही सर्व’ एक आहोत; त्यामुळे जबाबदारी सर्वांची असते, आनंदसुद्धा सर्वांनी मिळून घ्यायचा असतो, ही मानसिकता कुटुंबात केवळ संवादानेच तयार होते.
एकत्र कुटुंब हे आपले अजून एक वैशिष्ट्य आहे. 3-4 पिढ्या एकत्रितपणे राहणारी असंख्य कुटुंबे आहेत, एकत्र कुटुंबात सामान्यपणे अगदी लहान मुले, महाविद्यालयात जाणारे टीनएजर्स, मध्यम वयाचे आई-वडील आणि वयस्क आजी-आजोबा असतात. अशा कुटुंबामध्ये जनरेशन गॅप’च्या समस्या जाणवतात, त्याला कारणेही आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन त्यांच्या परीने योग्यच असतो, मात्र तो दोघांनीही समजून घेतला नाही, तर विसंवादाची सुरुवात होते. घरातील जेष्ठांनी तरुण पिढीला समजावून संागताना, आमच्या काळी असं नव्हतं बाई’, अशी वाक्ये न बोलता शब्दश: या पिढीच्या विचारांशी समरस’ व्हावे (दोघांची wave length tally व्हावी), म्हणजे विसंवाद होणार नाही. अर्थात या प्रक्रियेमधे घरातील जेष्ठांची भूमिका महत्त्वाची असते.
कालानुरूप परिस्थितीनुसार, बहुतांश कुटुंबाचा आकारही कमी कमी होत गेला आहे. तीन चार पिढ्यांची एकत्र कुटुंबे आता दुर्मीळ होताना जाणवतात. विशेषत: शहरी भागात आम्ही दोघे आमचा एक’ (किंवा आमची एक), अशी बहुतांश कुटुंबाची स्थिती आहे. आर्थिक गरजेपायी दोघेही पालक दिवसभर नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर असतात, मुले दिवसभर पाळणाघरात किंवा कॉलेजात असतात. सायंकाळी घरी परतल्यावर थकल्यामुळे, घरकामामुळे, घरी आणलेल्या ऑफिस कामामुळे, टी.व्ही.मुळे, व्हॉट्सअॅपमुळे मुलांसोबत सहज संवाद करायला वेळच नसतो. मुलांना खेळणी दिली, विविध क्लासेस्ची फी भरली, महागड्या शाळेत नाव घातले, सर्व प्रकारच्या सुखसोयी दिल्या की आपली जबाबदारी संपते, अशी (पाश्चात्य) भावना दिवसेंदिवस रुजताना दिसत आहे. They don't need your presents, they need your presence. हे ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या आई-बाबंाशी सहजसंवाद ही मुलांची भावनिक भूक असते, हे ध्यानात घेऊन त्यासाठी कितीही व्यस्त दिनक्रमांतून आग्रहपूर्वक कुटुंबासाठी वेळ काढलाच पाहिजे.
परंतु, बदललेल्या सामजिक रचनेमुळे आणि नवनवीन साधनंाच्या अनिर्बंध वापरामुळे संकल्पना बदलू लागल्या, तरुण पिढीची बोली भाषा बदलू लागली, कुटुंबातील या अंगभूत व्यवस्था काहीशा दुर्लक्षित राहू लागल्या. कुटुंबातील संवाद कमी कमी होऊ लागला आणि आता त्याचे विपरीत दृश्य परिणाम जाणवू लागले. मोबाईल, व्हॉट्सअॅप, गेम्स, टी.व्ही; इंटरनेट, फेसबुक, यू-ट्यूब, काँप्यूटर इत्यादी असंख्य साधनांच्या अनिर्बंध संचाराने आमच्या दैनंदिन जीवनाचा जणू ताबा घेतला आहे. कुटुंबाकडे, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामत: पाश्चात्य विचाराने प्रभावित असणार्या. नवीन संकल्पना, वेगाने रुजताना दिसत आहेत. कुटुंबांमधील मधील परस्पर अनौपचारिक सहज संवाद जाणवण्याइतपत कमी झाला आहे, विसंवाद वाढताना दिसतो आहे, व्यक्ती आत्मकेंद्रित होताना जाणवते आहे, याचा परिणाम घरातील तरुण मुले, विशेषतः तरुण मुली, आपली भावनिक भूक भागवण्यासाठी घराबाहेरील, मित्र मैत्रिणी यामध्येच अधिक रमलेली दिसतात. माझ्या जवळचे घरात कोणी नाही, ज्याच्याकडे मी माझ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करेन, अशा मानसिकतेमध्ये तरुण मुले मुली घराबाहेर ते प्रेम, तो जिव्हाळा शोधू लागतात आणि याच प्रवासात नको ते मित्र नको, त्या मैत्रिणी जवळच्या वाटू लागतात. या मानसिकतेचा गैरफायदा घेणार्या अनेक विकृत शक्ती समाजात सावज शोधत असतात, कधी मिशनरींच्या रूपात तर कधी लव-जिहाद’च्या रूपात अशा भावनेच्या भुकेल्या तरुण मुलींना जाळ्यात ओढले जाते.
लव-जिहादच्या जाळ्यात फसलेल्या तरुण मुलींना हे समजतच नाही की, हे प्रेम नसून प्रेमाचे केलेले नाटक आहे, आपल्याला फसवण्यासाठी मुसलमान धर्मानुसार केलेली ही पवित्र फसवणूक(?) आहे. हिंदू मुलीला फसवून प्रेमात ओढून धर्मांतरीत करून, तिचा वापर केवळ संतती वाढवण्यासाठी करणे याला जिहाद’ म्हणलेले आहे. आपण फसवले गेलो आहोत, हे जेव्हा त्या मुलीला समजते तेव्हा फार उशीर झालेला असतो. आता परतीची वाट फार अवघड असते, त्यामुळे काही सहजसाध्य उपक्रम आपण करू शकतो. उदा., केवळ आपल्या कुटुंबातील व्यक्तींचाच एक व्हॉट्सअॅप ग्रुप असावा, जेवत असताना टी.व्ही.समोर बसून न जेवता टी.व्ही. बंद ठेवून जेवावे, आठवड्यातून किमान एक दोन वेळातरी, ठरवून काही वेळ घरातील टी.व्ही; लॅपटॉप, मोबाईलसह सर्व गॅजेट्स बंद करून, सर्व कुटुंबाने एकत्र बसून गप्पा माराव्यात, आठवड्यातून किमान एक दोन-वेळातरी हास्य विनोदाच्या वातावरणांत सर्वांनी एकत्र भोजन करावे, आपल्या घरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या कोणत्याही शक्तीची सामूहिक उपासना करावी.
काय करावे, कसे करावे, कोणता उपक्रम करावा यासाठी कोणतीही संहिता नाही, परंतु कुटुंबातील संवाद वाढून घरातील वातावरण प्रेमाचे आनंदाचे राहावे आणि संस्कारक्षम भारतीय कुटुंब पुन्हा प्रस्थापित व्हावीत हेच लक्ष्य असावे. भारतीय कुटुंब व्यवस्था’ या भक्कम पायाच्या इमारतीला पडत असलेले हे तडे आपल्याच व्यवहाराने आणि चुकीच्या संकल्पनांमुळे आहेत. कुटुंब व्यवस्थेवरील हे पाश्चात्य विचारांचे आक्रमण थोपवण्याची मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे, मग चिंता करण्याचे कारणच राहणार नाही.
मोबाईल, व्हॉट्सअॅप, गेम्स, टी.व्ही; इंटरनेट, फेसबुक, यू-ट्यूब, काँप्यूटर इत्यादी असंख्य साधनांचा आपल्या सुसंस्कृत कौटुंबिक जीवनासाठी आपण योग्य प्रकारे वापर करून घेऊ शकतो, आवश्यकता आहे ती कोणासाठी कोण’ हे ओळखण्याची! समाज जीवनावर विपरीत आणि विकृत परिणाम करणार्या या माध्यमंाचा वापर बंद करणे किंवा त्याच्या वापरावर बंधने घालणे, हा त्यावर उपाय नाही. ही रेषा तर आता आहेच परंतु यापेक्षा मोठी रेघ’ ओढण्याचा प्रयत्न करणे, हे आपल्या हातात आहे, चला मोठी रेषा’ ओढू या.
- संजय अनंत कुलकर्णी
करियर कौंन्सिलर, पुणे
9766626040