महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२१
दिंनाक: 08 Jan 2021 16:34:53 |
नमस्कार,
‘मराठी भाषेची सकारात्मक चळवळ’, हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘शिक्षणविवेक’ आणि ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण-शिल्पकार चरित्रकोश’ यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषा संवर्धनासाठी मराठी राजभाषादिनानिमित्त इ.५वी ते इ.९वीच्या विद्यार्थ्यांसाठी
ऑनलाइन महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या शाळेतील इ.५वी ते इ.९वीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे, ही विनंती.
स्पर्धेसंबंधी माहिती :
- सदर स्पर्धा इ.५वी ते इ.७वी आणि इ.८वी व इ.९वी अशा दोन गटात घेतली जाईल.
- स्पर्धेचा कालावधी २५ मिनिटांचा असेल.
- वस्तुनिष्ठ स्वरूपाचे २५ प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. (पर्यायी उत्तरे)
- लिंकवरील पेपर सोडवून पेपर १२ फेब्रुवारीपर्यंत सबमिट करावा.
- विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसे.
- अधिक माहितीसाठी : शुभदा कुलकर्णी – ७३०४४०१५२२