कथालेखन कार्यशाळा

दिंनाक: 24 Feb 2020 16:22:24


शिक्षणविवेक व निर्मळ रानवारा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकभवन पुणे येथे कथालेखन कार्यशाळा शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेत जेष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम शिक्षणविवेक व निर्मळ रानवारा यांच्यावतीने प्रमुख मार्गदर्शक राजीव तांबे व उपस्थित प्रशिक्षणार्थींचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.अर्चना कुडतरकर यांनी केले. राजीव तांबे यांचा थोडक्यात परिचय करून दिल्यानंतर कार्यशाळेस आरंभ झाला.

बँकिंग, शिक्षण, मनोरंजन, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सुमारे ५० लेखकांनी यात भाग घेतला.
कथालेखनाचे मर्मच राजीव तांबेंनी उपस्थितांना
शिकवले. कथाबीज सुचण्यापासून कथेचे टप्पे नाट्य, संवाद, कथेचा शेवट कसा करायचा याबद्दलचे मार्मिक मार्गदर्शन उपस्थितांना मिळाले. ध्वनी, चव, वास व स्पर्श यांचे वेगवेगळे आयाम शब्दातून कथेत आल्यास मुले कल्पनाबंध निर्माण करून चित्र डोळ्यासमोर उभे करू शकतात.
राजीव तांबे यांच्या मिश्किल, पण मार्मिक संवादशैलीने उपस्थितांची मने जिंकली.
लहान मुलांसाठी त्यांच्याशी मानसिक पातळीवर एकरूप होऊन त्यांचे भावविश्व जाणल्यास या मार्गदर्शनाने उत्तम कथा लिहिता येतील असा विश्वास सर्वच सहभागींनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन स्वाती यादव यांनी केले. निर्मळ रानवाराच्या श्रीराम ओक यांनी आभार मानले.