स्वामी विवेकानंद जेव्हा छोटे नरेंद्र दत्त होते; तेव्हाची गोष्ट आहे ही! त्यांच्या घरी पाहुणे आले होते. त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारले, ‘तुला मोठेपणी कोण व्हायला आवडेल?’ नरेंद्रने पाहिले तर दाराबाहेर एक बग्गी चालवणारा बग्गीवान उभा होता. त्याची ऐट, त्याचे कपडे पाहून बालसुलभतेने नरेंद्र उद्गारला, ‘मला ना तसं बग्गीवान व्हायला आवडेल.’ त्यांचा हा संवाद ऐकत नरेंद्रची आई तिथेच उभी होती. तिने पटकन नरेंद्रचे लक्ष एका तसबिरीकडे वेधले आणि त्याला म्हणाली, ‘तुला बग्गीवान व्हायचे असेल ना, तर असा हो!’ ती तसबीर होती ..