खाई त्याला खवखवे
चिंटू खूप आनंदात होता. घरी गणपती बाप्पा येणार म्हणून जय्यत तयारी सुरू होती. आजोबा, बाबा, काका, चिंटूची ताई अशा सगळ्यांनी बाप्पाच्या सजावटीची तयारी सुरूदेखील केली होती आणि आई, आजी, काकू या लाडू, चिवडा, चकली, मोदक यांच्या तयारीत बिझी !..