थंडीची हवा

शिक्षण विवेक    09-Mar-2025
Total Views |


थंडीची हवा 

थंडीची हवा कुडकुडून काढी।

आजीच्या बटव्याची भलतीच गोडी ।।

आल्याचा रस जादूच करतो।

मिऱ्याचे चाटण खोकला पळवतो।।

पिवळ्या हळदीचा भलताच थाट।

थोपटवून घेते मजेत पाठ।।

कशाला हवेत अँटिबायोटिक्स ?

सुरक्षित ठेवतात व्यायाम आणि एरोबिक्स ।।

दोरीच्या उड्यांना नाही तोड।

आई मला मैदानावर खेळायला सोड।।

शरीर असे तुमचे फिट।

तब्येतीची नसे बिलकुल किटकिट ।।

शाळेतल्या क्रीडांगणावर भरपूर दमतो ।

बौद्धिक शारीरिक शक्ती वाढवतो ।।

शाळेमध्ये जे टॉनिक मिळते।

दिवसभर शरीर ताजेतवाने राहते।।

टॉनिक म्हणजे बौद्धिक, शारीरिक कष्टाचे तंत्र ।

यशस्वी व्हायचा हाच एक मंत्र ।।

 

- हर्षदा कारेकर 

शिक्षिका,डी.ई.एस. प्रायमरी स्कूल, पुणे