शाळेला सुट्टी मिळाली मिळून सारे बागेत जाऊ
झाडी, झुडूपांना भेटून हिरव्या राईत रमून जाऊ
निसर्गाचे मित्र होऊन वने जपू, वने वाचवू
गार वाऱ्यासंगे विहारू सरीवरून सरी झेलू
गवती मैदानावर खेळू फळे सारे खाऊ
रोपे नवी लावून वने जपू, वने वाचवू
सृष्टीचे पाठ रोज वाचू अभ्यास करू मन लावून
खेळात रंगून बागडू मानवतेचे गीत गाऊ
धरतीचे महत्त्व जाणून वने जपू, वने वाचवू
-राघवेंद्र वंजारी