माझी मायमराठी

शिक्षण विवेक    07-Mar-2025
Total Views |


माझी मायमराठी

 

शिवरायांच्या जिरेटोपावर चमके माय मराठी.

सावरकरांच्या 'सागरा'तूनी वाहे माझी मराठी.

गदिमांच्या रामायणातूनी फुलते माझी मराठी.

सुधीरजींच्या संगीतातूनी नाचे माझी मराठी

कुसुमाग्रजांच्या कवितेतूनी भावुक होई मराठी.

पु.ल. देशपांडेंच्या गोष्टींतूनी हसे माझी मराठी.

बालकवींच्या 'मखमाली' वर निजे माझी मराठी.

रामदासांच्या श्लोकांमधुनी शिकवण देई मराठी.

इतिहासाच्या पानांवर अजरामर होई मराठी.

महाराष्ट्राच्या मना-मनात रंगते माय मराठी.

- ओजस शाळीग्राम

८ वी,डी.ई.एस. सेकेंडरी स्कूल