सुट्टीचे दिवस किती किती छान
सकाळ सायंकाळ खेळण्यात भान
गृहपाठाची नसते अजिबात चिंता
डोक्यात नसतो अभ्यासाचा गुंता
उशिरा झोपायचे उशिरा उठायचे
पोहण्यासाठी नदीकडे पळत सुटायचे
आंब्याचा रस करायचा फस्त
गुलकंदाची आईस्क्रीम खायची मस्त
मिठा सोबत खायच्या काकडीच्या फोडी
आंब्याच्या लोणच्याची न्यारीच गोडी
शाळा आणि अभ्यासाशी केली आम्ही कट्टी
रोज असावी वाटते उन्हाळ्याची सुट्टी
-रवींद्र चालीकवार