बागेमध्ये सुरू होती पाखरांची सभा
तू येऊन राहिलास मधोमध उभा
वीजेसंगे केला कांगावा मोठा
आभाळ दादांनी दिला मोठाच धपाटा
पाखरांच्या सभेला उधळून लावले
वाऱ्यासंगे सोसाट्याचे गीत भारी गायले
लबाड इंद्रधनू लपले ढगांच्या कुशीत
उन्हाला पाहून आले एकदम खुशीत
रंगाची जादू थेंबांवर झाली
पाहायला गर्दी पाखरांची झाली
गीत कोकिळेने गायले छान
मोराने त्यावर नाचून डोलावली मान
बेडूकरावांनी डरावडराव करून केली कमाल
पावसाने केली सगळ्यांशी धमाल
पाण्यात सोडल्या रंगबिरंगी होड्या
मीही काढल्या पावसाच्या खोड्या
-सीमा गांधी