मैदानंच नाही खेळावं कुठे
सवंगड्यासह लोळावं कुठे
पर्यायी रस्त्यात मांडता डाव
शेजारी फुकाचे खातात भाव
जाईल गडे हो काचेला तडे
आम्हांला म्हणती बुटुक वेडे
थोराड शहाणे वेड्यात काढी
बुढ्याला लावून देते बुढी
तेव्हा ना येतो टोकाचा राग
रागाने सुकते खेळाची बाग
केव्हा हा सुटेल जागेचा तिढा
आणि सुधारेल शेजारी बुढा
| | भानुदास धोत्रे | |