निळे सावळे माड अलीकडे
आकाशाचे रंग पलीकडे,
चला मुलांनो हीच वेळ ती
नाचू गाऊ गीत नवे नवे
रंग बावरे पक्षी गाती
हसरी फुले, मोर नाचती
छुनछुन छुनछुन पाऊल पडते
हसरे बालक नाचू लागते
संध्येच्या या सदनी बागडू
फुलपाखरांना पाहूनी खिदळू
सोनसाखळीची गोष्टही सांगू
उंचउंच ते पक्षी पाहू
किती किती उंच हा डोंगर
लांबच नदी छोटे ओढे
मस्त झोपू कुरणावर त्या
नको अभ्यास नको काही
अशी ही दुनिया मस्त मजेची
चला सफर करू आनंदाची
हसा मुलांनो हसा
हसा मुलांनो हसा
| | स्वरूपा कुलकर्णी | |