ग्रिटिंग कार्ड स्पर्धेत सोळा हजार पेक्षा जास्त कार्ड आले होते. राज्यातील ११५ शाळांनी सहभाग घेतला होता.डी ई.एस.सेकंडरी शाळेतील ६५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यात शाळेतील कला शिक्षिका नीता अमोल उंब्रजकर यांना प्रथम क्रमांक तर गार्गी योगेश काणे या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.शाळेला ट्रॉफी आणि शॉल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सुलेखन स्पर्धेत शाळेतील तीन गुणी विद्याव्रतींना, विद्यार्थिनींना वास्तुविशारद आनंद पिंपळकर व चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांसह डी.ई.एस.माध्यमिक विभागाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षराचे कौतुक करण्यात आले. शिक्षिका व विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, शिक्षक-शिक्षिका आदींनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.