यामध्ये धरणाची प्रतिकृती, सौर ऊर्जा प्रकल्प, दळणवळणाची साधने, संदेशवहनाची साधने, रोबोट, लॅपटॉप, कम्प्युटर, पत्राचा प्रवास, जलशुद्धीकरण केंद्र, वॉटर फिल्टर, शेती व आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ज्वालामुखी, सूर्यचूल, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, विहीर, हॅन्ड पंप, क्रेन, धबधबा, ग्रामीण विभाग, शहरी विभाग, ओला कचरा सुका कचरा, खत निर्मिती, गांडूळ प्रकल्प, दीपस्तंभ, दुर्बीण असे विविध प्रकल्प प्रतिकृती / मॉडेल्स विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करून आणले होते. त्याचप्रमाणे हवेला दाब असतो, ज्वलनासाठी ऑक्सिजन ची गरज, वनस्पतींचे अवयव, पदार्थांच्या चवी, रिकाम्या जागेत हवा असते, तरंगणे बुडणे, विरघळणारे न विरघळणारे पदार्थ अशा विविध प्रयोगाचे विद्यार्थ्यांनी स्वत: प्रात्यक्षिक करून निष्कर्ष व अनुमान सांगितले व पाहुण्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. श्री. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या दिवशी पालकांनीही विज्ञान प्रदर्शनास भेट दिली व आपल्या पाल्यांचे व इतर विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
संपूर्ण प्रदर्शनाची तयारी इयत्ता पहिली ते चौथीच्या शिक्षकांनी केली होती.
शब्दांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर