म.ए.सो. मुलांच्या विद्यालयात ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा!

शिक्षण विवेक    01-Mar-2025
Total Views |


मराठी भाषा गौरवदिन

 

२७ फेब्रुवारी २०२५ रोजी म.ए सो. मुलांच्या विद्यालयात ‘मराठी भाषा गौरवदिन’ उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर मा. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर मा. पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाल साहित्यिक मा.अंजली अत्रे मॅडम सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता ५वी ते ९वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी केले, प्रास्ताविकेतून त्यांनी मराठी भाषा गौरवदिनाचे महत्त्व सांगीतले. प्रमुख पाहुणे मा.अंजली अत्रे यांचे स्वागत श्री मस्के सर यांनी केले.

श्रीमती खाडे मॅडम यांनी मराठी भाषा गौरवदिनानिमित्त महत्त्वाची माहिती सांगितली. मराठी भाषा दिनानिमित्त इ.५ वी ते ७वी विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले. ग्रंथपाल देव मॅडम यांनी ‘नटसम्राट’ या पुस्तकाचे परीक्षण केले. इयत्ता ७वी व ८वी च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव पोवाड्यातून सादर केला त्यांना श्रीमती तांबे मॅडम यांनी मार्गदर्शन केले होते. मराठी भाषा गौरवदिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस पात्र विद्यार्थी व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. अंजली अत्रे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरवदिनाचे महत्त्व छोट्या कथांद्वारे सांगितले तसेच मराठी भाषा गौरवदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ वामन मॅडम यांनी केले.

सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम निर्विघ्न पार पडला.