आमच्या मामाची म्हैस फिरत बसते गावभर
शरीरबांधा मोठा तिचा आहे बरं कणखर
शिंगे आत वळलेली तिचे शेपूट झुपकेदार
गवत, पेंड, आंबवण हाच तिचा आहार
कोळशासारखा रंग काळा पोट भले मोठे
तिचे दूध पिऊन लोक होतात धट्टेकट्टे
नदीनाल्यात डुंबत बसते किती वेळ
मुलांसाठी जणू तिचा सुरू होतो खेळ
कडबा, गवत दिसता जिभल्या चाटत हसते
कधीकधी चक्क ती चिखलात जाऊन बसते
म्हैस जाफराबादी दुधाचा ना तोटा
तिच्या दुधात कॅल्शिअम, प्रोटीन्सचा खूप साठा
अवखळ या म्हशीला मामाने बांधलाय गोठा
तिचे दूध विकून आज मामा झालाय मोठा
-एकनाथ आव्हाड