मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एन.ई.एम.एस शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन

शिक्षण विवेक    28-Feb-2025
Total Views |


मराठी भाषा गौरवदिन

 

शनिवार पेठेतील एन.ई.एम.एस शाळेत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले. इयत्ता ३री आणि ४ थी दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली यामधे विद्यार्थ्यांनी विविध कवींच्या कविता सादर केल्या.इयत्ता ३ री ते ७ वी साठी अक्षर रसिक सुलेखन,पुणे यांच्यातर्फे श्री. शैलेश जोशी यांनी हस्ताक्षर आणि शुद्धलेखन यावर आधारित कार्यशाळा घेतली तसेच मराठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचे महत्त्व समजावे, त्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने लोकमान्य कल्चरल फाउंडेशन आणि नीलकंठ प्रकाशन तर्फे विविध पुस्तके विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आली. इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांकडून महाभारत ह्या पुस्तकातील कथांचे नियमित वाचन घेण्यात आले.

तसेच कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा देत वर्गावर्गात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अक्षरावरून शब्द तयार करणे, वाचाल तर वाचाल या विषयावर उत्स्फूर्त चारोळी लेखन करणे,मराठी लेखक,कवी, संत ह्यांवर आधारित फिरवा चक्र सांगा माहिती म्हणजेच स्पिन व्हील असे उपक्रम घेण्यात आले, 'ऐटीत मराठी' हे गीत विद्यार्थांनी सादर केले.

मराठी भाषा विषय शिक्षकांनी मुखाध्यापिका श्रीमती. हेमांगी देशमुख

यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे नियोजन केले होते.