दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी टिळक मार्ग येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेमध्ये सकाळ व दुपार विभागाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. शिवजयंतीच्या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. शिवाजी महाराजांच्या बद्दलचे विचार व्यक्त केले. कविताचे सादरीकरण केले. ‘जय शिवाजी जय भवानी’ ‘जय जिजाऊ जय शिवराय’ असा जयघोष केला.
काही विद्यार्थ्यांनी माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, मावळे आदींची वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभिनयातून उत्तम सादरीकरण केले. उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील शिक्षिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया’ या आरतीचे समूहाने गायन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेमधून प्रभात फेरी काढण्यात आली. डी.ई.एस.सेकंडरी शाळेतून टिळक मार्ग, अलका टॉकीज, लालबहादूर शास्त्री मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये फलक हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. या प्रभात फेरीमध्ये माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींच्याही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक, डी. ई.एस. सेकंडरी स्कूल, पुणे