डी.ई.एस.सेकंडरी शाळेत ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा!

शिक्षण विवेक    28-Feb-2025
Total Views |


मराठी भाषा गौरवदिन

 पुणे: डी. ई. एस.सेकंडरी शाळेत ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी जन्मदिवस, ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्यात आला.

शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला हारार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. मराठी दिनाच्या कार्यक्रमात मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर,मराठी विभागातील शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते.

प्रारंभी मराठी विषय शिक्षक राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे यांनी कवी कुसुमाग्रज व मराठी दिनाची माहिती दिली. यानंतर मराठी विषय शिक्षिका पल्लवी धिवार व विद्यार्थिनी विभा हरिश्चंद्र यांनी कवी सुरेश भटांचे 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ' गौरव अभिमान गीत सादर केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी अनुश्री कुलकर्णी हीने मराठी दिनाबद्दल मनोगत व्यक्त केले.

मराठी दिनाचे औचित्य साधून सुलेखनकार शैलेश जोशी यांचे ‘सुंदर हस्ताक्षर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शैलेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना सुंदर लेखनासाठी उत्तम मार्गदर्शन केले. शैलेश जोशी यांचा परिचय मराठी विषय शिक्षिका गौरी देवळणकर यांनी करून दिला. मराठी दिनाच्या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिकांनी आठवणीतल्या म्हणींचे सादरीकरण केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने मराठी दिनाची सांगता करण्यात आली. पल्लवी धिवार यांनी पसायदानाचे गायन केले. मराठी विभागातील गौरी देवळणकर, राघवेंद्र गणेशपुरे, पल्लवी धिवार, दीप्ती देवधर, कांचन सोलापूरकर, प्राची कुलकर्णी, अरुंधती क्षीरसागर, विजया जगताप, आरती घनवट व शाळेतील शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे

शिक्षक, डी. ई. एस.सेकंडरी शाळा, टिळक मार्ग, पुणे ३०